शेरू उडी मार, मिठ्ठू उडी मार,
शेरू उडी मार, शेरू उडी मार
पिवळी गांधीलमाशी आली,
शेरूच्या नाकाला चावली,
नाक ठणकू लागले, नाक ठणकू लागले,
काय करावं बरं?
कोणाला सांगावं बरं?
शेरू भुंकू लागला,
एवढ्यात मिठ्ठू आला.
आता मिठ्ठूला समजलं,
गांधीलमाशीने नाक चावलं,
मिठ्ठूने नळ सोडला, मिठ्ठूने नळ सोडला,
शेरूला पाण्याखाली धरलं,
नाकाला लिंबू लावलं,
ठणका कमी झाला,
नाक बरं झालं.
तू माझा लाडका शेरू,
अन मी तुझा लाडका मिठ्ठू,
शेरू बरा झाला, शेरू बरा झाला.
शेरू उडी मार, मिठ्ठू उडी मार.
I had written this poem in 2007.