कुत्र्याच्या दोन पिल्लांची गोष्ट


एकदा एका कुत्र्याची दोन पिल्लं बागेत खेळत होती. खेळतानाच, त्यांना भूक लागली. त्यांना वाटलं की आपण काहीतरी खाऊया. त्यांना एक दोरी दिसली. त्यांनी ती खाऊन बघितली. त्यांना ती बरी लागली नाही. मग ती पुढे गेली. त्यांना एक जुनी चप्पल दिसली. त्यांनी ती खाऊन बघितली, पण त्यांना तीही तितकी बरी लागली नाही. मग ती पुढे गेली. त्यांना एक थर्माकोलचा तुकडा दिसला. त्यांनी तो खाऊन बघितला. पण तो त्यांना मुळीच चांगला लागला नाही. शेवटी दोन्ही पिल्लं जेवण्यासाठी घरी गेली.

I had written this story in 2005.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *